वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली 🇮🇳. (अकोला जिल्हा प्रतिनिधी :) राजेश दामोदर : दि ९ जाने २६ : जम्मू–काश्मीरमधील कुपवाडा सेक्टर येथे मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असतानाजवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले.देशाच्या सीमेवर उभा राहून शत्रूशी सामना करताना त्यांनी अतुलनीय शौर्य, धैर्य आणि देशभक्तीचे दर्शन घडवले. आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.त्यांच्या या हौतात्म्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर, गावावर आणि राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, देशासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या या वीर सुपुत्राचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.हसत हसत गेले प्राण,देशासाठी केला बलिदान…अमर राहील शहीद वैभव लहाने यांचे नाव.वीर जवान नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना कोटी-कोटी नमन व भावपूर्ण श्रद्धांजली.ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.शहीद जवान अमर रहे…जय हिंद! 🇮🇳सर तुम्हाला
byमीडीया पोलीस टाईम
-
0