स्वतःच्या उमेदवारीवर निष्ठेचा 'अंकुश' ठेवला, म्हणूनच आज नियतीने यशाचा गुलाल अंकुशभाऊंच्या कपाळी लावला!राजकारणाच्या या झगमगत्या जगात अनेक चेहरे येतात आणि जातात, पण काळजाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी जागा तोच बनवतो ज्याने सत्तेच्या उजेडापेक्षा संघर्षाचा काळोख जास्त सोसला असतो. हिंगणघाट नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी माझे बंधुतुल्य मित्र आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अंकुशभाऊ ठाकूर यांची झालेली नियुक्ती ही केवळ एका पदाची निवड नाही, तर ती एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य निष्ठेला नियतीने दिलेला राज्याभिषेक आहे.अंकुशभाऊंचा हा प्रवास आज जरी वैभवाचा वाटत असला, तरी त्याची मुळे एका अत्यंत कठीण आणि प्रतिकूल संघर्षात रुजलेली आहेत. आयुष्याची सुरुवात अतिशय साध्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतून झाली. पदरी कोणतीही राजकीय वारसाहक्क नसलेली पार्श्वभूमी, ना पाठीशी मोठा आर्थिक आधार; होतं ते फक्त डोळ्यांत स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न आणि काळजात पक्षाची अढळ निष्ठा! तो काळ आठवला की आजही अंगावर शहारे येतात, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नाव घ्यायला किंवा पक्षाचे काम करायला लोक धजावत नसत. अशा विपरित परिस्थितीतही 'हिंदुत्वाचा' विचार छातीशी कवटाळून हा तरुण रात्रीच्या गडद अंधारात घराबाहेर पडायचा. हातात दोन-चार निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन, कुणाचीही भीती न बाळगता मध्यरात्रीच्या वेळी शहराच्या भिंतीवर पोस्टर चिकटवणारा आणि स्वतःच्या हाताने बॅनर लावणारा तो अंकुश ठाकूर आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. ज्या हातांनी मध्यरात्रीच्या बोचऱ्या थंडीत आणि विपरित स्थितीत पक्षाचे झेंडे लावले, त्याच हातांना आज नियतीने श्रमाची पावती म्हणून अधिकाराची लेखणी दिली आहे.अंकुशभाऊंनी केवळ राजकीय पातळीवरच लढा दिला नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेल्या मर्यादांशी आणि परिस्थितीशी दोन हात केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत, घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीवर आपल्या अफाट कष्टाच्या जोरावर मात केली. शून्यातून विश्व निर्माण करत आज त्यांनी जे स्वतःचे अढळ स्थान आणि भव्यदिव्य परिस्थिती निर्माण केली आहे, ती त्यांच्या जिद्दीची आणि प्रामाणिकपणाची सर्वात मोठी साक्ष आहे. त्यांनी दाखवून दिले की, कर्तृत्ववान माणसाला परिस्थिती कधीच रोखू शकत नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या काळात सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर आणि अन्यायावर आवाज उठवण्यासाठी अंकुशभाऊ हिंगणघाटच्या रस्त्यावर वाघासारखे उतरले. जनतेच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलनांचा धडाका लावून सरकारला वेठीस धरले. या संघर्षात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा सामना करावा लागला, पण "पक्षासाठी आणि जनतेसाठी जेलमध्ये जायला लागलं तरी मागे हटणार नाही," ही त्यांची वृत्तीच त्यांच्यातील नेतृत्वाचा खरा कस लावणारी ठरली.अंकुशभाऊंची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची 'माणसं जपण्याची' आणि 'माणसं घडवण्याची' वृत्ती. त्यांनी केवळ स्वतःचे पद पाहिले नाही, तर युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली. त्यांनी ज्या ज्या युवकांवर जबाबदारी सोपवली, त्यातील कित्येक युवक आज शहरातून तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी म्हणून सन्मानाने कार्य करत आहेत. २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतः उमेदवारीसाठी पूर्णतः पात्र असताना आणि सर्वत्र बंडखोरीचे चित्र असतानाही, पक्षाने जेव्हा वेगळा आदेश दिला, तेव्हा अंकुशभाऊंनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला निष्ठेचा 'अंकुश' लावत तो आदेश शिरसावंद्य मानला. या युवकाने आपले मार्गदर्शक आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांचा विजय हाच आपला श्वास मानला. स्वतःच्या उमेदवारीचा त्याग करून, दिवस-रात्र एक करत त्यांनी कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवली आणि हिंगणघाट नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.त्यांच्या याच अढळ निष्ठेची, आंदोलनातील धैर्याची आणि संघटन कौशल्याची दखल घेऊन आमदार समीरभाऊंनी वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांची 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून निवड केली. हा सन्मान म्हणजे त्या मध्यरात्रीच्या जागरणाचा, अंगावर घेतलेल्या पोलीस केसेसचा, स्वतःच्या कर्तृत्वावर बदललेल्या परिस्थितीचा आणि आमदार महोदयांवरील अढळ विश्वासाचा झालेला सन्मान आहे.थोडक्यात सांगायचे तर, ज्याने स्वार्थाच्या लाटेवर नेहमीच 'निष्ठा' आणि 'त्यागाचा' अंकुश ठेवला, आज त्याच अंकुशभाऊंच्या कर्तृत्वाचा सुगंध संपूर्ण हिंगणघाट शहरात दरवळत आहे. अंकुशभाऊ, तुमच्या या संघर्षातून जन्मलेल्या लोकसेवेच्या यज्ञाला कोटी कोटी शुभेच्छा! तुमचा हा प्रवास येणाऱ्या पिढीतील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी "निष्ठा कशी असावी" याचा आदर्श वस्तुपाठ ठरेल. ___________________________________________ ★ राहुल कालिंदी रमेशराव दारुणकर ★ मुक्त पत्रकार :- राजकीय विश्लेषक प्रदेश अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता युवा परिवर्तन की आवाज संघटना महाराष्ट्र राज्य#AnkushThakur #Hinganghat #BJP #YuvaMorcha #SamirbhauKunawar #SuccessStory #Struggle #Loyalty #Nishtha #HinganghatPolitics #MaharashtraBJP #InspirationSamir Kunawar Nayana Umesh Tulaskar
byमीडीया पोलीस टाईम
-
0