*खादमीन-ए-उम्मत संस्थेच्या वतीने 'आफताब-ए-सहाफत' विभागीय पुरस्कारासाठी ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांची निवड.*. (लातूर (म. मुस्लिम कबीर):साहित्यिक, स्तंभलेखक, कवी, पत्रकार तसेच विधिज्ञ ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांना नांदेड येथील खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेला 'आफताब-ए-सहाफत' (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे एका विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे.ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांच्या कविता व लेखनाचे मराठी व हिंदी वृत्तपत्रांतून नियमित प्रकाशन होत असते.ते सा.लातूर रिपोर्टरचे कार्यकारी संपादक व स्तंभलेखक असून ‘प्रश्नचिन्ह’ व ‘आँखों देखा हाल’ या नावाने प्रसिद्ध होणारे त्यांचे स्तंभलेख वाचकप्रिय ठरले आहेत. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते मराठी व हिंदी पत्रकारितेत सक्रिय असून, सध्या ते विविध वर्तमानपत्रांमध्ये लेखन करीत आहेत.पत्रकारितेसोबतच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, गेल्या २५ वर्षांपासून ‘खिदमत-ए-खल्क’ व ‘सोशल वेल्फेअर सोसायटी’ च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सतत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून, ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल व राहत अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य ते करीत आहेत.अनेक क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत खादमीन-ए-उम्मत संस्थेने त्यांची या विभागीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. 'आफताब-ए-सहाफत' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतून ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.दरम्यान,खादमीन-ए-उम्मत संस्थेचे अध्यक्ष आबेद खान हमीद खान यांच्या वतीने पुरस्कार निवडीचे पत्र अलहाज सलीम अलंद सर व अलहाज सय्यद म.सलीमोद्दीन करीमोद्दीन सर यांच्या हस्ते प्रदान करून ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांना शुभेच्छा देण्यात आल्या.हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ॲड इक्बाल शेख यांचे सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.

खादमीन-ए-उम्मत संस्थेच्या वतीने 'आफताब-ए-सहाफत' विभागीय पुरस्कारासाठी ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांची निवड.*.                                            
Previous Post Next Post