*मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञान प्रयोगशाळांना भेट* विज्ञान म्हटलं की विविध विषयाचे कुतूहल आणि उत्सुकता होय. विज्ञानातील नवनवीन शोधांमुळे आज मानवाचे जीवन सुकर झालेले आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये विविध विषयाबाबत जिज्ञासा उत्पन्न व्हावी या अनुषंगाने मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे विज्ञान विभागामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोग शाळा निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता विद्या विकास हायस्कूल, हिंगणघाट येथील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा निरीक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. प्रयोगशाळा निरीक्षण करत असताना वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, गणितशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या प्रयोगशाळेमध्ये विविध वस्तूंचे, उपकरणांचे तसेच विषयामधील बारकावे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक चार्ट्स तसेच प्रतिकृतींच्या सहाय्याने समजून घेतले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर तसेच विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नितेश रोडे यांच्या परवानगी ने तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक या सर्वांच्या देखरेखी खाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागातून प्रा. दर्शना रेंढे, प्रा. मानसी चौधरी, प्रा. श्रेया गायकवाड प्राणीशास्त्र विभागातून प्रा. शितल धार्मिक व प्रा. तेजस्विता सहस्त्रबुद्धे, रसायनशास्त्र विभागातून प्रा.अंबिका ठवरी व प्रा. दिपाली दुधे, भौतिकशास्त्र विभागातून प्रा. कीर्ती बावणे, प्रा. समीक्षा पवार व प्रा. रोहिणी बोरकर आणि गणित शास्त्र विभागातून प्रा. किरण कष्टी व प्रा.मयुरी धोंडे या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञान प्रयोगशाळांना भेट*                      
Previous Post Next Post