*के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण गौरव*. (मानवत / अनिल चव्हाण.*)————————*मानवत येथील के. के. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अमोल साळवे यांची रेल्वे स्टेशन मास्तर पदी नियुक्ती झाल्याबद्दल मानवत येथील के. के.एम. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.पंडित मोरे, डॉ.प्रदीप गिरासे, स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री. अनंत गोलाईत ( गहिलोत ) के.के. महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री. गणेशजी उबाळे, प्रा अनिलजी सोळंके, प्रा बालासाहेब भिसे पाटील, तसेच विद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अमोल साळवे यांनी के. के.एम. महाविद्यालया मध्ये शिक्षण घेत असताना *१शिस्त, परिश्रम आणि चिकाटीच्या* जोरावर आपली शैक्षणिक वाटचाल यशस्वी केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना *अमोल साळवे* यांनी महाविद्यालयाने दिलेले मार्गदर्शन, शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान आणि संस्थेचे संस्कार यामुळेच मी आज हे यश मिळाविले असल्याचे सांगून सर्व उपस्थित आदरनिय गूरूजन वर्गासह सर्वांचे आभार व्यक्त करूण शतक्षा ॠणी असल्याचे भाव व्यक्त केले.***

के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण गौरव*.                  
Previous Post Next Post