*विज्ञान प्रदर्शनातून नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रदर्शन :* ब्रिलियंट स्कूल, हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम . दिनांक १७/१/२६ रोजी ब्रिलियंट सी.बी.एस.इ. स्कूल मध्ये शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात इयत्ता १ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स आणि प्रयोगांच्या सहाय्याने विज्ञानातील संकल्पना स्पष्ट केल्या. या प्रदर्शनात सौर उर्जा, जलप्रदूषण, मानवी शरीररचना, पर्यावरण रक्षण, कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकासाचे मॉडेल इत्यादी विषयावर आधारित अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने साकारले. सदर प्रदर्शनाला प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास संस्थेच्या सचिव व हिंगणघाट शहराच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, विद्या विकास शाळेचे मुखाद्यापक श्री. रोडे सर, फार्मसी कॉलेज चे प्रिन्सिपॉल डाॅ. महेंद्र गुंडे, टी.आय.एस.टी. कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. राजविलास कारमोरे, तसेच मातोश्री कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सपना जयस्वाल उपस्थित होते. विविध माॅडेल्सचे परीक्षण प्रा. शीतल कारमोरे व प्रा. कल्याणी हिवरकर यांनी केले. सदर प्रदर्शनी सगळ्यांसाठी खुली ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाला पालक तसेच संस्थेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी आवर्जून भेट दिली व सर्वांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीचे कौतुक केले. प्रदर्शनात रस्ते सुरक्षा, सौर ऊर्जा, कचऱ्यातून इंधन व ऑरगॅनिक शेती हे विषय लक्षवेधी ठरून पारितोषिकास पात्र ठरले. कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षिका शीतल घाटुर्ले यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. विलास राऊत यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले अमूल्य योगदान दिले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0