चोपडा पोलीस उपविभाग जिल्ह्यात "नंबर वन"जानेवारी २६, २०२६ चोपडा पोलीस उपविभाग जिल्ह्यात "नंबर वन".. (चोपडा, दि.२६( संजीव शिरसाठ) चोपडा पोलीस उपविभागाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभागाचा मान मिळाला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव, अडावद येथील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही उपलब्धी मिळाली आहे.चोपडा उपविभागाच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि समस्त पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0