* *निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————मानवत तालूक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील ताडबोरगाव सर्कल मधील खरबा येथे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गेलेले पाथरी मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच प्रचार अर्थावर थांबवून मानवतच्या दिशेने जात असतानाच गाडीत बसून आपल्या भावना आवरणे त्यांना शक्य झाले नाही. दादांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध आठवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. चालत्या गाडीतच त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.मानवत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या नंतर जिल्हा व मानवत तालुक्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार राजेश विटेकर पुन्हा भावुक झाले. बंधू श्रीकांत विटेकर यांच्या गळ्याला पकडून आपल्या अश्रूंना वाट करून देत होते. त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते, मात्र डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांच्या दुःखाची तीव्रता व्यक्त करत होते. अजित दादा पवार यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध यामुळे हा धक्का अधिक तीव्र असल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती..

निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*.                                                                            
Previous Post Next Post