*ध्येय निश्चिती हेच यशाचे खरे गमक**@)> – बालासाहेब कच्छवे.*. (मानवत / वार्ताहर)———————————— मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयामध्ये आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नांदेड येथील *मा.श्री. बालासाहेब कच्छवे* यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचे महत्त्व प्रभावी पणे पटवून दिले. आपल्या अमोघ रसाळवाणीतून परखड पणे मार्गदर्शन करताना त्यांनी जिवनातील अनेक प्रसंग सांगितले, यावेळी ते बोलतांना म्हणाले की ध्येय निश्चिती हेच यशाचे खरे गमक असून आयुष्यात मोठे होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वतःचे ध्येय ठरवले पाहिजे, कारण एकदा ध्येय ठरले की त्या दिशेने वाटचाल आपोआप सुरू होते. बुद्धिमत्ता ही कोणाकडे कमी- जास्त नसून ती सर्वांकडे जवळपास समान प्रमाणात असते, मात्र तिचा उपयोग आपण कशा प्रकारे व कशा पद्धतीने करतो यावर यश अवलंबून असते, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट पणे मांडून मत व्यक्त केले. यशस्वी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘तीन टी’चा फॉर्म्युला समजावून सांगितला, *ज्यामध्ये ट्राय, टॅक्ट आणि टॅलेंट* हा तीन T चा फॉर्म्युल आहे. सतत ट्राय (प्रयत्न) केल्यावर टॅक्ट (अनुभव व सराव) मिळतो आणि एकदा टॅक्ट आली की टॅलेंट आपोआप विकसित होते, असे त्यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करतांनी सांगितले. यावेळी त्यांनी *थॉमस एडिसन* यांना बल्बचा शोध लावताना ९९९ वेळा अपयश आले तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत, हे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटीचे महत्त्व पटवून दिले. आपण केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण न घेता भविष्यात नोकरी देणारे बनावे, स्वतःचा उद्योग- व्यवसाय उभारून इतरांनाही रोजगार द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एक टक्का टॅलेंट आणि ९९ टक्के परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणते ही ध्येय साध्य करता येते, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धाडसी व प्रेरणादायी जीवन प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटका करून घेत देशासाठी केलेले त्यांचे कार्य आज ही प्रत्येक भारतीया साठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जगात मोठी झालेली माणसे ही जाती-पैशांच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून जगली असून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अशा अनेक महान विचारवंतांची उदाहरणे देत त्यांनी समाज व राष्ट्र घडवण्यात अशा व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले. “मनी वसे ते स्वप्न दिसे” या उक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस, वैज्ञानिक, पायलट होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा मोलाचा सल्ला देत त्यांनी आई-वडील, गुरुजन व समाज यांच्याशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आज मी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळे मधिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली, याचा मला विशेष आनंद असून या शाळेने मला घडवले आणि आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे भाग्य मला लाभले, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी बोलतांना व्यासपीठावरून व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड होते तर प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापक मा.श्री. जी. एस. शिकवाल, ॲड. अंकुशरावजी कच्छवे, अल्काताई सोळंके, सोरेकर, संपादक गोपाळराव लाड, शाळेतील शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते; कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमूख मा.श्री. सदाशिवराव होगे पाटील यांनी केले. तर उपस्थित सर्व मान्यरांचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा.श्री. विश्वनाथजी बुधवंत यांनी मानले.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0