अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा.यांनी केला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा.. .वर्धा जिल्हा प्रतिनिधीअब्दुल कदिर दि. १२ जानेवारी २०२६ रोजी माँ साहेब जिजाऊ स्मारक दादाजी धुनिवाले चौक येथे करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणी ते सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या एक महान माता होत्या .जिजाऊंनी बालपणापासूनच शिवरायांवर उत्तम संस्कार केले.रामायण,महाभारतातील शौर्य कथा सांगून त्यांनी शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्ध आणी स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली.त्या शिवरायांच्या केवळ माताच नव्हे तर त्यांच्या गुरु आणी मार्गदर्शकहि होत्या ,एवढंच नाहीतर त्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधून स्वराज्य निर्माण करावे या साठी प्रेरित केले.आणी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली म्हणूनच त्यांना स्वराज्य जणनी, राष्ट्रमाता,राजमाता,माँ साहेब ,आऊसाहेब,अश्या विविध नावाने सभोधले जाते. ज्यांनी शिवबा घडविला,ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले.आणी ते प्रत्यक्ष्यात उतरविले अश्या ह्या मातेस कोटी,कोटी,नमन करून मानाचा मुजरा करून श्रधेचि श्रद्धांजलि, आदराची आदरांजली,अर्पित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. ह्या जन्मोत्सव सोहळा प्रसंगी प्रामुख्याने वर्धाचे लोकप्रिय नगराध्यक्ष सन्मानीय श्री सुधीर भाऊ पांगुळ असून यांच्या हसते ह्या पावन सोहळ्याचे द्विप प्रज्वलन करून प्रतिमेला मालयार्पण करून पूजा करण्यात आली.तर मान्यवराणी आपले मत प्रकट करून माँ साहेबांच्या अथांग कार्यावर प्रकास टाकण्याचे काम केले.व उपस्थित मान्यवराणी नगराध्यक्षय सुधीर भाऊ यांचे पुष्प गुच्य देऊन सन्मान व सत्कार करुन उपस्थित मंडळीने अभिनंदन केले. ह्या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्षा शैलेजा साळुंखे ,शहर अध्यक्षा भरतीताई चांदूरकर, शहर उपाध्यक्ष भाग्यश्री निघडे,तर कार्यक्रमाचे मुख्य प्रेरक प्रणिता ताई माउसकर,निताताई भांडवलकर,कीर्ति सोलंकी, जया जाधव,देवयानी वानोडे,समृद्धी आदमणे,सुनीता ताई डुकरे,अर्चना देवडे,संजीवनी काणसकर,सोबतच वर्धाच्या विविध समाजिक संघटना,समाजिक कार्यकर्ते व बहू संखेने मान्यवर उपस्थित असून जिजाऊ वेशभूष्या परिधान करून आलेल्या जिजाऊचे आनंद व आदरपूर्वक सर्वत्र कवतुक झाले आणी कार्यक्रमाची सांगता झाली....
byमीडीया पोलीस टाईम
-
0