प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!*पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी*यावलमध्ये आंबेडकरी संघटनांचा संतप्त एल्गार*. (✒️ यावल तालुका प्रतिनिधी रविंद्र आढळे ✒️)नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याच्या निषेधार्थ यावल तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना आंबेडकरी चळवळीतील संघटना, बौद्ध समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले.“हा विसर नाही, हा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे!”निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, बाबासाहेबांचे नाव न घेणे हा केवळ भाषणातील अपघात किंवा विसर नसून, तो संविधानाचा, बाबासाहेबांचा आणि कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधाननिर्मात्याचे नाव टाळणे म्हणजे दलित-वंचित समाजाच्या आत्मसन्मानावर घाला घालण्यासारखे आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.“भीमकन्यांचे धैर्याला सलाम!”या घटनेविरोधात वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी कार्यक्रमस्थळी निर्भीडपणे जाब विचारत आवाज उठवला. या दोन्ही भगिनींच्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “या भीमकन्यांना संपूर्ण आंबेडकरी समाजाचा पाठिंबा आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.राज्यभर आंदोलनाचा इशाराजर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.“बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही… संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही!” अशी आक्रमक भूमिका संघटनांनी जाहीर केली आहे.मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भगवान मेघे, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत इंगळे, लक्ष्मी ताई मेंढे, भिम टायगर्स सामाजिक संघटनेचे मुख्य सचिव सुपडू संदानशिव, नसीर खान, विकी वानखेडे, अरुण गजरे, मिलिंद जंजाळे, किरण तायडे, नितीन बोरेकर, विजय बाविस्कर, विनोद सोनवणे, सिद्धार्थ अडकमोल, बाळू अडकमोल, नरेंद्र अडकमोल यांच्यासह समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या व यावल तालुक्यातील असंख्य आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाची भूमिका काय?या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0