महायुतीचा विजय झाल्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटा कडून आनंद उत्सव....... (तालुका प्रतिनिधि: यासीन मलक हिंगनघाट: )राज्यात नुकताच लागलेल्या २९ महानगर पालिकेत निकालामध्ये महायुतीचा विजय संपुर्ण राज्यात दिसुन आलेला आहे. हा मुंबई महानगर पालिकेत किंगमेकर महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अनाथाचे नाथ म्हणुन ज्यांची ओळख आहे असे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने ठाणे व मुंबई महानगर पालिकेत घवघवीत यश मिळवले आहे. तसेच राज्यातील इतर महानगर पालिकेत ही आपले नगर सेवक माठिया संख्येने निवडुन आले आहेत व राज्यात क्रमांक २ चा पक्ष म्हणुन शिवसेना समोर आल्याचा निकालात दिसुन येत आहे. शिवसेना जिंदाबाद असे नारे शिवसैनिकांनी या प्रसंगी दिले. या विजयाचा आनंद हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये महिला व पुरूष शिवसैनिकांनी बॅड व फटाके वाजवुन आनंद व्यक्त केला आहे. स्थानिक माता मंदीर व चोखोबा वार्ड परिसरातील शिवसैनिकाच्या वतीने राज्यात एकनाथ शिंदे नेतृत्वात मिळालेल्या यशामुळे तो आनंद साजरा करण्यात आला व यापुढील निवडणुकी मध्ये सुध्दा असेच यश मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी सतीश चौधरी सर, विकास हांडे (उपशहर प्रमुख), सोनु लांजेवार, प्रतिक चाफले, अनिकेत कासरवार, गणेश कोल्हे, विशाल पुरनाके, सतीष तांबोळी, तुळसीराम डफ, धिरज सिडाम, गणेश बावणे, भारत मने, मंगेश बावणे, कुलभुषण वासनिक, महिला पदाधिकारी सुनिताताई तांबोळी (शहर प्रमुख), वंदनाताई हांडे, लक्ष्मीबाई लोहकरे, तेजस्विनीताई अराडे, अंजुताई सोनटक्के, सोनुताई जाधव, नंदाताई सायंकार, प्रितिताई हांडे, प्रितीताई लोहकरे, सिडाम ताई, रजनीताई गोस्वामी, कांता झोरे, गुंफा रोठे व महोदय वयोवृध्द पुरूष शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीचा विजय झाल्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटा कडून आनंद उत्सव.......                                                                                  
Previous Post Next Post