लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत संभ्रम.केवायसी पूर्ण असूनही अनेक महिला वंचित.. (. *यावल विभागीय उपसंपादक फिरोज तडवी )* : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन सुमारे दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक अनुदान देण्यात येत असून, त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळत आहे.योजनेच्या सुरुवातीपासूनच अनेक महिलांना हे अनुदान नियमितपणे आणि वेळेवर मिळत होते. मात्र, अलीकडे या योजनेचे अनुदान रखडले होते. दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे योजनेचे पैसे काही महिलांना बहिणींना मिळाले. काही बहिणींना याची अद्यापही प्रतीक्षा करावी लागत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन महिन्यांपूर्वी शासनातर्फे लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी (केवासी) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ही प्रक्रिया जवळजवळ सर्व पात्र महिलांनी पूर्ण केली आहे. अनेक महिलांनी आधार, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केली. मात्र दोन महिन्यांपासून रखडेले हप्ते काही महिलांना मिळाले तर काही महिलांना अद्यापही मिळालेले नाही. तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे.दोन महिन्यांपासून अनुदान बंद झाल्याची भीतीनोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे अनुदान न मिळाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये 'आपले अनुदान बंद झाले की काय?' अशी भीती निर्माण झाली आहे. अनुदान बंद झाले असेल, तर त्यामागचे कारण काय, कोणत्या त्रुटीमुळे ते थांबले आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती संबंधित विभागाकडून महिलांना मिळालेली नाही. महिलांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे.अनुदानात अचानक अडथळाकेवायसी करण्यापूर्वी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे अनुदान नियमित जमा होत होते. मात्र, केवायसी पूर्ण करूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांचे अनुदान काही महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाही. विशेष म्हणजे, केवायसी पूर्ण केलेल्या काही महिलांना अनुदान मिळाले आहे, तर काही महिलांना अजूनही अनुदान न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. केवायसी पूर्ण करूनही नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांचे अनुदान काही महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाही. तर केवायसी पूर्ण केलेल्या काही महिलांना अनुदान मिळाल्याने इतर महिलांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे.त्रुटी असल्यास दुरुस्तीची संधी द्यावीकाही महिलांच्या केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी किंवा बैंक खात्याशी संबंधित समस्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागांनी अनुदान न मिळालेल्या महिलांना त्रुटींची माहिती द्यावी आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत संभ्रम.केवायसी पूर्ण असूनही अनेक महिला वंचित..                                               
Previous Post Next Post