रामनगर पोलिसांची मोठी कारवाई : ४१० ग्रॅम एमडीसह एकास अटक.. वर्धा :- रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत ४१० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. या प्रकरणी शुदोधन मुकीदा साटे (वय ३६, रा. नागसेन नगर, नालवाडी, वर्धा) यास अटक करण्यात आली आहे.पोलीस स्टाफ सपोनी अंबदास टोपले, कुंदा तुरक, अवी बनसोड, मनोज भोगले, मुकेश वांदिले, विक्की अनेराव व नितेश वैद्य हे पेट्रोलींग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नमूद आरोपी व त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ४१० ग्रॅम एमडी (किंमत अंदाजे २,०५,३५० रुपये), तीन मोबाईल फोन व एक बॅग असा एकूण २,२८,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद सकेश्वर व प्रभारी ठाणेदार टाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई : ४१० ग्रॅम एमडीसह एकास अटक..                                                                                     
Previous Post Next Post