.*शाळेतील मुलींच्या सुरक्षेबाबत शासनाचे नियम व योजना कोणत्या? – डॉ. राजेश्वर हेंद्रे यांचा सवाल* (पुणे विशेष जिल्हा प्रतिनिधी ): (*प्रा सुभाष अण्णा शेटे राष्ट्रीय मिडिया प्रमुख मार्गदर्शक युवा क्रांती पोलिस मित्र संघटना*) - राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विविध नियम व योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते, "याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत "*डॉ.राजेश्वर हेंद्रे* (राष्ट्रीय संघटक) यांनी शासनाला सवाल केला आहे."*डॉ. हेंद्रे यांनी सांगितले की, शाळेत ये-जा करणाऱ्या तसेच शाळेच्या परिसरात शिक्षण घेणाऱ्या मुलींची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे*. यासाठी शासनाने विविध नियम व उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.*शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, महिला तक्रार निवारण समिती, पोलीस मित्र यंत्रणा, सुरक्षित बस व्यवस्था, स्वच्छ व स्वतंत्र स्वच्छतागृह, तसेच ‘गुड टच – बॅड टच’ याबाबत जनजागृती कार्यक्रम अशा अनेक उपाययोजना शासनाने सुचविल्या आहेत*. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोस्को (POCSO) कायदा, महिला सुरक्षा हेल्पलाईन, तसेच शाळा सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.मात्र ग्रामीण भागात आणि काही शाळांमध्ये या नियमांची अंमलबजावणी अपुरी असल्याचे दिसून येते. त्यामुळे *शासनाने शाळांमधील मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक कडक उपाययोजना कराव्यात, तसेच सर्व शाळांमध्ये सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही डॉ. राजेश्वर हेंद्रे यांनी केली आहे"*.विद्यार्थिनी सुरक्षित राहिल्या तरच त्यांचे शिक्षण व भविष्य सुरक्षित राहील, त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0