`इकरा पब्लिक स्कूलचा 'कोहिनूर' चमकला; माजी विद्यार्थी सय्यद शोएबची सीए परीक्षेत गगनभरारी!` (रावेर / शेख शरीफ)देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सय्यद शोएब सय्यद फारूक याने इकरा पब्लिक स्कूल, मोहाडीच्या यशाच्या परंपरेत एक सुवर्ण पान जोडले आहे. मार्च महिन्याच्या निकालात शोएबने आपल्या बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवत हे यश संपादन केले.मूळचे संभाजीनगरचे रहिवासी असलेले सय्यद शोएब यांच्या जडणघडणीत इकरा पब्लिक स्कूलचा मोठा वाटा आहे.शाळेत घालवलेल्या ५ वर्षांच्या काळात त्यांना मिळालेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांच्या यशाचा पाया ठरले. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सीए होण्याचे ध्येय समोर ठेवले आणि आज ते पूर्ण करून दाखवले.इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी शोएबच्या यशावर आनंद व्यक्त करताना म्हटले की, "शोएब हा इकराचा खऱ्या अर्थाने कोहिनूर आहे. त्याची मेहनत आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती (Never Give Up Attitude) आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीपस्तंभ आहे.जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट कशी शक्य करता येते, हेच त्याने सिद्ध केले आहे."या देदीप्यमान यशाबद्दल शाळेचे प्राचार्य शेख शकील व सर्व शिक्षक वृंदांनी शोएबचे अभिनंदन केले आहे. "आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आज देशाच्या आर्थिक क्षेत्रातील उच्च पदावर पोहोचला आहे, ही आमच्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे," अशा भावना प्राचार्य शेख शकील यांनी व्यक्त केल्या.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

