आजनसरा, जि. वर्धा.
आजचा दिवस वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला!
दिनांक.12/4/2026,ला सायंकाळी 6, वाजता
................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
..................................
श्री क्षेत्र आजनसरा येथे श्री संत भोजाजी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. महाराजांच्या कृपेने या पावन भूमीत विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते वर्धा नदीवर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणाऱ्या भव्य पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
हा पूल केवळ दोन जिल्ह्यांना जोडणार नाही, तर या भागातील व्यापार, दळणवळण आणि विकासाला मोठी गती देणारा ठरेल.
यावेळी मा. ना. डॉ. अशोकजी उईके साहेब (मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य), मा. ना. संजयजी राठोड साहेब (मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य), मा. ना. डॉ. पंकजजी भोयर साहेब ( गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा), श्री. अमरजी काळे (खासदार वर्धा लोकसभा ), श्री रामदासजी तडस (माजी खासदार वर्धा लोकसभा), श्री. सुरेशजी वाघमारे ( माजी खासदार वर्धा लोकसभा) श्री. समीरजी कुणावार (आमदार, हिंगणघाट विधानसभा), श्री. राजेशजी बकाने (आमदार, पुलगाव देवळी विधानसभा) व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

