अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान *दिनांक 25 एप्रिल 2026 समता नायक, जगत ज्योती ,क्रांतीसुर्य, महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव व सत्कार समारंभ...*
अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान
🔆दरवर्षीप्रमाणे बसव विचार समिती तथा शिक्षक मित्रपरिवार अकोट यांच्या त्यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट शहरामध्ये 921वी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
🌷कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत आप्पा कौठकर होते.
प्रमुख अतिथी माननीय आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे, गुरुदेव सेवा मंडळ शिवदासजी गाडेकर, डॉ.सुनील चव्हाण तहसीलदार, उपनगराध्यक्ष प्रथमेश बोरोडे, महिला व बालकल्याण सभापती नैनाताई विशाल आप्पा इंगोले, समन्वयक जिल्हा उद्योग प्रभाकर चौधरी, अकोला मनपा सदस्य शंकर आप्पा लंगोटे ,माजी जि.प सदस्य गजाननभाऊ काकड, विजय आप्पा लष्करे, दिपाताई साल्पेकर हे होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या
🎤मनोगतातून महात्मा बसवेश्वर यांच्या समता, बंधुत्व, स्वातंत्र्य ,कायक,दासोह,आणि प्रगत विचारांच्या संदेशाचे समाजात प्रसार करण्याचे आवाहन केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
💐या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा शाल,सन्मानचिन्ह, महात्मा बसवण्णांचे जीवनचरित्र ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
🔆 अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी सह
लिंगायत समाज बांधव व शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विषेश म्हणजे महिला मंडळी उपस्थित मोठ्या प्रमाणात होती.
सूत्रसंचालन -चंद्रशेखर महाजनसर
प्रास्ताविक -मंगेश आप्पा दसोडे, तर आभारप्रदर्शन -उमेश चोरे सर यांनी केले.
🔆कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन बसवविचार समितीच्या पदाधिकाऱी श्री अरुण आप्पा सांगळोदकर, डॉ.विशाल आप्पा इंगोले,शशांक आप्पा कासवे ,सागर आप्पा उकंडे, प्रतिक आप्पा गोरे,दिनेश आप्पा मेनसे,गजानन आप्पा मुंगसे, कैलास आप्पा थोटे, गजानन आप्पा चिंचोळे,गोपाल गोंडागरे,विश्वास कुरवाडे,यांनी परिश्रमपूर्वक पार पाडले.
मंगेश आप्पा दसोडे
बसवविचार समिती
तथा
शिक्षक मित्र परिवार
अकोट

