प्रा.डॉ.वकार शेख यांची इकरा एच जे थीम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती
महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक (रावेर/ शेख शरीफ)
इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगावच्या प्राचार्य पदी प्रा.डॉ.वकार शेख अब्दुल रज्जाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रा.जाकीर बशीर यांची इकरा शाहीन उर्दु हाय स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या सुपरवायेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच प्रा शेख नूर यांची इकार उर्दु हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सालार नगरच्या सुपर वायेजर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार ,अब्दुल रशीद शेख, अब्दुल मजीद शेठ जकरिया, प्रोफेसर जफर शेख, अब्दुल अजीज सालार, अब्दुल नबी दादा बागवान, तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

