राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हासचिवपदी दयानंद सूर्यवंशी.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देगलूर तालुक्यातील संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी देत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये दयानंद सूर्यवंशी यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.तालुकाध्यक्षपदी जि.प.चे माजी सदस्य शिवाजीराव कनंकँटे यांची निवड करण्यात आली असून, बाजार समितीचे माजी सभापती मंगल देशमुख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष स्थापनेपासून कार्यरत असलेले राहुल देसाई (तालुकाध्यक्ष) आणि देवेंद्र मोतेवार (शहराध्यक्ष) यांनीही संघटन बळकट करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच, जिल्हा उपाध्यक्षपदी नारायण शेळगावकर, तर युवा तालुका अध्यक्षपदी प्रशांत मानूरकर यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी आयोजित कार्यक्रमात आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी सभापती व्यंकटराव गोजेगावकर आणि माजी आ. अविनाश घाटे यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रमेश शिवणीकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या नियुक्त्यांमुळे देगलूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

