# **फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती**
**कार्यक्षमतेचे फळ; फैजपूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव**
**फैजपूर | पाडळसे तालुका प्रतिनिधी सुरेश खैरनार
फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेले **श्री. रामेश्वर मोताळे** यांची गृह विभागातर्फे **पोलीस निरीक्षक (PI)** पदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह फैजपूर आणि यावल परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
**कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख:**
श्री. मोताळे यांनी फैजपूर येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हेगारीवर वचक बसवणे, गुन्ह्यांची उकल करणे आणि सामान्य नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेची आणि सेवेची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्यांना निरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे.
**शुभेच्छांचा वर्षाव:**
पदोन्नतीचे वृत्त समजताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच फैजपूर येथील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व फैजपूर पोलीस पाटील ग्रुप ने त्यांचे अभिनंदन केले आहे. मोताळे यांच्या पुढील प्रवासासाठी आणि नवीन जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
>
>

