सागवान लाकडाची अवैध तस्करी, धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ

सागवान लाकडाची अवैध तस्करी, धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ

(रविंद्र आढाळे उपविभागिय जिल्हा प्रतिनिधी)

यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन प्रशांत जोशी यांना माहिती मिळाल्यानुसार त्यांनी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक सौरीष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तची कार्यवाही केल्याने यावल पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्रातून अवैध सागवान व आडजात लाकडाची तस्करी व वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवार दि.११ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून नायगाव – किनगाव रस्त्यावर रात्री १० वाजता चे सुमारास दबा धरून बसले असता महिंद्रा वाहन पिकअप क्र. MH -०४ EL ७६५८ गाडी ची तपासणी केली असता प्लास्टिक करेटचे खाली विनापरवाना साग चौपाट नग ८ घनमिटर ०.१७७ माल किंमत ३९३९ – चे मिळून आले. वाहनाची किंमत ५ ,२५०००/- रु असा एकूण ५२८९३९ /- चा मुद्देमाल जप्त केला.गाडीचा वाहन चालक हा वाहन सोडून फरार झाला.सदर वाहन मुद्देमालासह घटनास्थळावरून जप्त करून शासकीय काष्ठ आगार यावल येथे जमा केली आहे.त्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी प्रथम रिपोर्ट क्र.६/२०२६ दि.११ मार्च २०२६ चा जारी केला.
भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ ( २ ) ब.अन्वये नोंदविण्यात आला आहे.सदरची कार्यवाही सौरिष सहाय्यक उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक यावल यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.सदर कार्यवाही प्रशांत जोशी.वनपरीक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल,विपुल पाटील वनपरिमंडळ अधिकारी वाघझिरा,संजय इंडे,वन परिमंडळ अधिकारी हरीपुरा वनरक्षक – हनुमंत सोनवणे,चेतन शेलार,अक्षय रोकडे इंदल चव्हाण,
मोहन कच्छवाह,आनंद तेली,
सरला भोंगरे,सीमा भालेराव यांनी केली.
Previous Post Next Post