*कारला गावचा सेवा सहकारी सोसायटी जिल्हा बँकेचा ठराव भारतीय जनता पार्टी कडे..*
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
कारला गावातील सेवा सहकारी सोसायटी बरखास्त झाल्यानंतर नव्याने झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारत स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. या निवडणुकीत सोसायटीच्या एकूण 175 सभासद संख्ये पैकी 158 सभासद मतदारांनी सहभाग नोंदवला.
भाजपच्या वतीने जिल्ह्याचे अभ्यासू व विकासात्मक दृष्टिकोन असलेले प्रगल्भ नेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायगाव विधानसभेचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार राजेशजी पवार साहेब आणि या भागातील लोककल्याणकारी शेतकरी नेते व व्ही.पी.के. समूहाचे उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कारला सेवा सहकारी सोसायटी च्या ठरावासाठी शांताबाई रावसाहेब पाटील पवळे यांची उमेदवारी दाखल करण्यात आला होती,त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहन लक्ष्मण भुताळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता,दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजप च्या वतीने शांताबाई रावसाहेब पवळे यांना 84 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहन लक्ष्मण भुताळे यांना 74 मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या शांताबाई रावसाहेब पवळे ह्या 10 मतांनी विजय मिळवत कारला सेवा सहकारी सोसायटीचा जिल्हा बँकेचा ठराव भारतीय जनता पार्टी कडे आणला या निवडणुकीत कारला गावातील बहाद्दर मतदारांनी विरोधकांच्या दबावाला न जुमानता निर्भयपणे मतदान केले. समाजातील सर्व घटकांच्या अडी-अडचणीत सहभागी होणारे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे शेतकऱ्याचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मतदारांनी मतदानाच्या रूपाने त्यांना आशीर्वाद दिला या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने कारला गावातील सर्व सभासद, ग्रामस्थ तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.

