फैजपूरच्या तहानगर भागातील पाण्याची पाईपलाईन बदलल्याने शुद्ध पाणीपुरवठा
फैजपुर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी
फैजपुर येथील तहानगर भागातील नागरिकांना काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिक झाली होती त्यामुळे तहानगर शिफा हॉस्पिटल जवळ पिण्याचे पाणी दूषित येत होते परंतु तहानगर येथील नागरिकांच्या तक्रारीची मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे आणि फैजपूरच्या नगराध्यक्षI दामिनी पवन सराफ तसेच प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका सुमया बी शेख कुर्बान तसेच नगरसेवक हकीम तडवी यांनी या प्रभागाच्या नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत त्वरित येत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना यापासून कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेतली आणि चार इंची नवीन पाईपलाईनचे काम तात्काळ करण्यात आले यामुळे या भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू झालेला असून त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे

