*रिजर्व बँकेच्या मार्गदर्शनातून वाल्मिकी बँकेचा आर्थिकस्तर कायम उंचावत ठेवू*
*@)> चेअरमन आदित्य नखाते.*
{मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण }
———————————
पाथरी येथे शांताबाई नखाते विद्यालयात भव्य सत्कार कार्यक्रम.
रिजर्व बँक व सहकार विभागाच्या मार्गदर्शनातुन वाल्मिकी को-ऑपरेटिव्ह बँक पाथरीच्या माध्यमातून सभासदाचा आर्थिक विकास साधण्याचा माझा संकल्प आहे, यातून
वाल्मिकी बँकेचा आर्थिकस्तर कायम उंचावत ठेवू असे प्रतिपादन वाल्मिकी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. पाथरीचे चेअरमन आदित्य नखाते यांनी केले.
वाल्मिकी को-ऑपरेटिव्ह बँक पाथरीच्या चेअरमनपदी आदित्य अनिलराव नखाते यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथरी येथे शांताबाई नखाते विद्यालयात मंगळवारी आयोजीत भव्य सत्कार कार्यक्रमप्रसंगी सत्काराला उत्तर देताना चेअरमन आदित्य नखाते बोलत होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, महसूल अधिकारी स्वप्ना परदेशी, मुख्याध्यापक एन. ई.यादव,मुख्याध्यापक के. एन.डहाळे,प्राचार्य आर. व्ही.कांबळे, पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी सुमित वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आदित्य नखाते म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष अनिलराव नखाते यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्र विस्तार आणि गरजू व होतकरू सभासदाला नियमांच्या चौकटीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी मी तत्पर राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांनी सत्कारमूर्तीं चेअरमन आदित्य नखाते यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक मुख्याध्यपक किशन डहाळे यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम सोनवणे यांनी केले,बळीराम चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी,पालक,कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
***

