लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका मध्ये जगत ज्योती म. बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील संपूर्ण आजूबाजूच्या पंचक्रोशात एक आदर्श ठरलेल्या डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका व वाचनालय या समिती मंडळाकडून प्रत्येक महामानवाच्या जयंती निमित्त महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून आभिवादन करण्यात येत आहे.बाराव्या शतकातील महान क्रांतिकारक माणुसकी व समानता हाच खरा धर्म जातीयवादी नष्ट करून समानतेचे राज्य निर्माण करणारे जगत ज्योती लिंगायत धर्माचे संस्थापक व धर्मगुरू महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आभासिका व वाचनालयात दि.१९/०४/२०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता महात्मा बसेश्वरच्या चरणी पुष्प अर्पण करून अभिवादन व नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावरील घडलेला प्रसंग त्यांची कार्य त्यांनी केलेल चळवळी,लोकांना दिलेले संदेश समाजामध्ये माणुसकीने वागण्याचे मंत्रमुग्ध याबद्दल ओबडधोबड वाणीतून लहान मुले थोडक्यात अभ्यासिकेत विचार मांडले. यावेळी पत्रकार राजेश आमेटवार वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, सचिव राजू अंजनीकर,ग्रंथपाल राजू अंजनिकर, लघुळकर आकाश, अंजनिकर सुनिल,दीपक एडकेवार तसेच अभ्यासिकेतील लहान चिमुकले मुले मुली उपस्थित होते.

