*
कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी अर्थीक बेजार*
*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
———————————
मानवत तालूक्यातील ऊस उत्पादक बागातदार शेतकरी अर्थीक
बेजार तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याने परिसरातील साखर कारखान्यास ऊस दिलेला आहे.
परंतु सर्वच कारखान्याने 31 डिसेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्याचा ऊस गाळापासाठी गेलेला आहे त्यांचेच पेमेंट अदा केलेले आहे.
31 डिसेंबरच्या नंतर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याला दमलाही दिलेलं नाही जवळपास चार महिने ऊस गाळपास देऊ नये शेतकऱ्याला त्याच्या उसाचा मोबदला मिळालेला नाही शेतकऱ्याला कधीकाळी नैसर्गिक आपत्ती याचा सामना करावा लागतो कधीकाळी कारखान्याच्या प्रशासनाशी सामना करावा लागतो चार-चार महिने झाले तरी उसाचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे काही शेतकऱ्याचे मुलीचे लग्न असो लेकराची फीस असो किंवा शेतीसाठी खते घेणे असो हे खाजगी सावकारा मार्फत करावे लागत आहे काही शेतकऱ्याकडे पूर्वीचेच खाजगी सावकाराचे कर्ज असल्यामुळे तो शेतकरी अडचणी त सापडला आहे आपण आता पूर्व मशागत कशी करायची एकीकडे मजूर मिळत नाही त्यामुळे सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी करत आहेत चार महिने झाले ऊस घालून छद्माही कारखान्याने दिला नाही त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झालेली आहे शेतकरी एकमेव असा आहे लाखो रुपयाचा ऊस कारखानदारास उधार देतो मात्र शेतकऱ्याला एक खताची गोणी ही कोणीही उदार देत नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन प्रत्येक कारखान्याची केन पेमेंट यादी मागून घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्याला त्याच्या उसाचे पैसे देण्यास भाग पाडावे अशी मागणी अर्थीक बेजार व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त होत आहे.

