*
मिरखेल येथे संतशिरोमणी रविदास महाराज मंदीर बांधकाम प्रगती पथावर*
*{{ भाविकांना मदतीचे आवाहन }}*
*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
———————————
परभणी जिल्हातील मिरखेल येथे संत रोहिदास महाराज यांचे ग्रंथ वाचन गेल्या ४० ते ४५ वर्षापासुन सामाजीक जेष्ठ भाविक भक्त बालासाहेब राजाराम धोंगडे हे वाचन करीत होते. त्यांच्या जागी बाळासाहेब बालासाहेब धोंगडे यांनी मंदीर बांधकामाचा संकल्प केल्यामुळेच भव्यदिव्य असे मंदीराची उभारणी होत असून या दोन मजली भव्य मंदिराचे बांधकाम प्रगती पथावर असल्यामुळे समाज बांधवा मधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्हातील मिरखेल या गावी संत शिरोमणी रोहिदासजी महाराज यांचे भव्य दिव्य असे दोन मजली मंदिराचे बांधकाम सूरू असून सर्व भावीक भक्त , समाज बांधव यांनी दिलेल्या निधीतून कामे होत असून भव्य दिव्य असे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मंदीर बांधकाम हे प्रगती पथावर असून त्यामुळे समाज बांधवासह नागरिकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
तसेच समाजातील दानशुर व्यक्ती व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की मंदीर बांधकाम हे एक दोन दहा पाच लोकांचे काम नाही. सर्व समाज बांधवांनी व भाविक भक्त यांच्या सहकार्य निधीतून हे काम होत आहे.
सर्व समाज बांधवांच्या सहकार्य मिळून आपल्याला मंदिराचं काम पूर्ण करायचं आहे. तरी समाजातील दानशुर बांधवांनी आपल्या सामाजीक व्यवहारातून जसे जमेल तसे आपण आपल्या इच्छेनुसार सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करावी. तेव्हा कुठे मंदीर बांधकाम पूर्ण होण्यास मदत होऊन पूर्णपणे संत शिरोमणी रोहिदास महाज यांच्या मंदिराचा कळसा पर्यंत काम पूर्ण होईल संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात समाज बांधवांचे मोठे वास्तव्य असून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात
सर्व समाज बांधवांनी मंदीर बांधकामास सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन संत शिरोमणी रोहिदास महाराज मंदीर बांधकाम समितीच्या वतीने बाळासाहेब बालासाहेब धोंगडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रत्येक समाज बांधवांनी माझा पण खारीचा वाटा या प्रमाणे आपल्या इच्छा नुसार मंदीर बांधकाम निधी देण्यात यावा असे आवाहन धोंगडे यांनी केले.
***

