*पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा : राहुल जयकर यांची जळगाव जिल्हा सचिवपदी निवड*
*यावल तालुका ग्रामीण प्रतिनिधी : मुक्कदर तडवी*
पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव तथा भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.राहुल जयकर हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व विकासाशी संबंधित उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक व पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात वृक्षलागवड, पाणी संवर्धन, पर्यावरण जनजागृती यासंदर्भात व्यापक स्तरावर उपक्रम राबविण्याचा मानस राहुल जयकर यांनी व्यक्त केला आहे.

