स्पर्धेत जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो : डॉ. पंकज भोयर

स्पर्धेत जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो : डॉ. पंकज भोयर 

समूद्रपुर वर्धा जिल्हा विभागीय प्रतिनिधी राजु कांबळे 


आंतरशालेय कराटे स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न

     वर्धा. समाजाला निरोगी बनवण्यासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. सशक्त नागरिकच सशक्त समाज निर्माण करू शकतात. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण देण्याची दितांत गरज आहे. कराटे खेळातून आत्मविश्वास निर्माण होत असून आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही अशक्य कार्य शक्य होऊ शकते. आजच्या स्पर्धात्मक युगात जो स्पर्धेसोबत टिकतो तोच विजयी होतो. खेळाडूला स्वतःचे स्थान टिकवायचे असेल तर परिश्रम व प्रचंड आत्मविश्वासाची गरज असते. प्रत्येक खेळाडूची आपली आगळीवेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. या स्पर्धात्मक युगात जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो. असे मौलिक विचार महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. 

       18 एप्रिल रोजी शिववैभव सभागृहात "कराटे - डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित" वर्धा जिल्ह्यातील आंतरशालेय राज्य, राष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

   यावेळी मंचावर ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश इखार, उपाध्यक्ष मोहन मोहिते, कोषाध्यक्ष विजय सत्याम, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभुदय मेघे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, वर्धा कला महोत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, समाजसेवक प्रदीप बजाज, एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमी चे संचालक पवन तिजारे, समाजसेवी अर्चनाताई भोंमले, विद्याताई कळसाईत, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधर पाटील, युवा नेते पृथ्वीराज शिंदे, बोरगाव मेघे येथील सरपंच संतोष सेलुकर, सेलू येथील ज्येष्ठ समाजसेवक संजय जैस्वाल, एटीट्यूड अकॅडमीचे संचालक अंबुज पांडे, रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार राजू बानमारे, हॉकी असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे सचिव कृष्णा जोशी, बॅडमिंटन अकॅडमी चे संचालक नितीन जाधव, युनिक कॅरिअर अकॅडमी चे संचालक इंद्रजीत वाघमारे, संघर्ष कॅरिअर अकॅडमीचे संचालक अमित कावडकर, व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

     कार्यक्रम स्थळी राज्यस्तरीय स्पर्धेकरिता सब ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप वर्धा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी नागपूर येथील सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक व कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच शिहान अनवर अली व डिजिटल संगणीकृत कार्यवाह अमरावती येथील सेन्साई वेदांत डाहे, सेन्साई ध्रुव बांगरे यांनी पार पाडली. 

      कार्यक्रमाचे आयोजन मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सेन्साई काशिनाथ रघाटाटे, सचिव शिहान मंगेश भोंगाडे, कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत यांनी केले. प्रस्तावना सेन्साई निलेश राऊत, संचालन सेन्साई पूजा गोसटकर तर आभार सेन्साई अभिषेक सोनवणे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक शिहान राजू कांबळे, शिहान कृष्णा ढोबळे, शिहान रमेश भगत, शिहान पराग पाटील, शिहान अभिजीत पारगावकर, सेन्साई वृषभ सावसाकडे, सेन्साई सलीम शेख आर्वी, सेन्साई गोपी कोटेवार हिंगणघाट, सेन्साई चेतन जाधव, सेन्साई अमोल मानकर, सेन्साई वृषभ चावरे, सेन्साई समीर साहू, सेन्साई शुभम राखडे, सेन्साई सिद्धार्थ गजभिये, सेन्साई कार्तिक भगत, सेन्साई सुरज राजपूत, सेन्साई वैभव साखरकर, प्रणय विटणकर, सौ. अंकिता धुर्वे व इत्यादी कराटे प्रशिक्षक उपस्थित होते. 

     सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त खेळाडू देवांशु लाखे, नैतिक राऊत, मोहिनी चुटे, पियूष सिंग, कैवल्य सागरकर, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी गौरव असानी, वर्धा जिल्ह्यातून नॅशनल ला कोच म्हणून जाणारी पहिली महिला प्रशिक्षण कू. रुचिका ढेंबरे, तर राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवणारे पियूष हावलदार, समीर देवतळे, अर्णव लोखंडे, साहिल तेलहांडे, भार्गव खेवले, मधुरा गावंडे, स्नेहा बलवीर या खेळाडूंचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
Previous Post Next Post