*तरोडा गावाचा शिरपेचात मानाचा तूरा ; अहद युसुफ शेख यशस्वी पणे MBBS पदवीधर*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
९५२७३०३५५९-
———————————
परभणी तालुक्यातील तरोडा गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून, गावातील होत करू युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित MBBS पदवी यशस्वी पणे संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे. विशेष म्हणजे, तरोडा गावातून MBBS शिक्षण पूर्ण करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*अहदने* आपल्या जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्याच्या यशामागे त्याच्या वडिलांचे मोठे योगदान असून, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये मिस्त्री काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ दिले.
आर्थिक अडचणींवर मात करत अहदने आपले शिक्षण पूर्ण केले, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.
अहदच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला असून, त्याच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहिले जात आहे. गावकऱ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व आप्तगणातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अहद युसुफ शेख भविष्यात एक कुशल व संवेदनशील डॉक्टर बनून समाजसेवेत आपले योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*****

