मशाल ए हिंद फाउंडेशन रावेरला 150 स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट.नजीर अहमद यांचे शिक्षणासाठी मोठे योगदान; विद्यार्थ्यांना मिळणार दिशा

मशाल ए हिंद फाउंडेशन रावेरला 150 स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

नजीर अहमद यांचे शिक्षणासाठी मोठे योगदान; विद्यार्थ्यांना मिळणार दिशा

महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक रावेर (शेख शरीफ)

रावेर शहरातील प्रसिद्ध समाजसेवी संस्था मशाल ए हिंद फाउंडेशन येथे गुरुवार, दिनांक 7 मे 2026 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, रोजगार व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्याची दखल घेत चिनावल येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तसेच MIM रावेर तालुका अध्यक्ष जनाब नजीर अहमद साहेब यांनी संस्थेला सुमारे 150 मौल्यवान व दुर्मिळ स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट दिली.
या पुस्तकांमध्ये रेल्वे, MPSC, UPSC तसेच पोलिस भरतीसाठी उपयुक्त असलेल्या विविध पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात औसाफ शेख यांच्या कुरआन तिलावतने करण्यात आली. यावेळी नजीर अहमद साहेब यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. तसेच मशाल ए हिंद फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही अधिक पुस्तके व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास नजीर अहमद साहेब (चिनावल), सफदर पहलवान, सऊद मेंबर, अल्ताफ मेंबर, सादिक मेंबर, महमूद मेंबर, जाबिर शेख, अनवर अली पत्रकार, रुकमुद्दीन शेख, सुल्तान मेंबर, कामिल मेंबर आणि रियाजुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी मशाल ए हिंद फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज सर, सय्यद मुजफ्फर अली, ॲड. मुजाहिद शेख, वाजिद भाई, वसीम शेख, शहनवाज सर, रेहान अहमद, कामिल शेख, सुल्तान, निसार अहमद, डॉ. कामिल भाई, अन्सार खान सर तसेच मशाल ए हिंद फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
Previous Post Next Post