वंचित आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या, 72 व्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून केला साजरा.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :आज 10 मे रोजी स्वाभिमान दिवस म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा72 वा वाढदिवस हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड च्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे वाटप, मिठाईवाटप, वंचित बहुजन आघाडीच्या नाम फलकाच अनावरण आदी विविध उपक्रम राबवून सकाळी ठीक सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं. त्यानंतर महात्मा फुले पुतळा या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्यानंतर शालेय साहित्याचे वाटप व मिठाईवाटप करून तरोडा नाका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकाचा अनावरण करण्यात आलं. दिनांक 19 मे वार मंगळवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर नवीन नांदेड कवठा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे.
बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी समता सैनिक दलामध्ये काम करणाऱ्या दीक्षा गजभारे हिचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
तेव्हा या सर्व उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य अँड. अविनाश भोसीकर यांची उपस्थिती लाभली. यावेळी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन,
नांदेड दक्षिणचे जिल्हा महासचिव रविभाऊ पंडित तुप्पेकर नांदेड, उत्तरचे जिल्हा महासचिव दीपक मगर, जिल्हा सचिव अजय (बंटी) गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने, पंढरीनाथ अहंकारे, जिल्हा संघटक संजय टिके, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, रामराव ढवळे, धाराजी हिंगोली, अँड. जयपाल ढवळे, डॉ. गोरखनाथ पाटील, विनोद कुमार वाघमारे, बालाजी सूर्यतळे, बालाजी सावंत, दीपक कसबे, उत्तम वाढवे, गौतम सावते, गणपत सवयी सोनकांबळे, विद्यानंद पोवळे, प्रल्हाद इंगोले, विनायक गजभारे, डॉ. रामचंद्र वनंजे धम्मा धम्मा एंगडे, यासह नांदेड दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

