६१ लाख खर्च करुन देखील चारमळीत पाणीबाणी !

६१ लाख खर्च करुन देखील चारमळीत पाणीबाणी !

 जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे . 

                                 मौजे चारमाळी (ता. यावल) येथे केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी "जल जीवन मिशन, हर घर जल" योजनेचा प्रत्यक्षात पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. सुमारे ६१ लक्ष दहा हजार २२६ रुपये इतका निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आदिवासी भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागत असल्याची वस्तुस्थिती अत्यंत लज्जास्पद असून प्रशासनाच्या
कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप नवसंजवनी जिल्हा समिती सदस्या प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. या कामाची पाइपलाइन व इतर कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची करण्यात आली

तत्काळ टँकरची व्यवस्था करण्याची मागणी
गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे द्योतक आहे. "हर घर जल योजना चारमाळीत प्रत्यक्षात "हर घर त्रास ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. चारमाळी गावासाठी तात्काळ दररोज पाणी टँकरची व्यवस्था करण्यात यावी "जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी असून पाण्याच्या टाकीसाठी केलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. संपूर्ण योजना कागदोपत्री पूर्ण दाखवून प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अपूर्ण व निकृष्ट कामे त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, या प्रकरणाची पालकमंत्र्यांनी स्वतः दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. ७ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा, असा इशारा चारमाळी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.ठेवले आहे. यामुळे चारमाळी गावातील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दररोज सुमारे दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. या कडे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे..
Previous Post Next Post