हिंगणघाट शहरात लग्न घरी चोरी करणारा आरोपी पोलीसाचे जाळयात .......................................

हिंगणघाट शहरात लग्न घरी चोरी करणारा आरोपी पोलीसाचे जाळयात  
.......................................
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
.....................................
 दि. 07/05/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे श्रीमती मंगला राजु नरड रा.माता मंदीर वार्ड, हिंगणघाट यांनी रिपोर्ट दिली की, त्यांचे मुलाचे दि. 05/05/2026 रोजी लग्न झाले आणि लग्नाचे पाहुन घरी असल्याने त्यांनी रात्रीवेळी त्याचे घराचा समोरील दरवाजा उघडा ठेवला आणि अंगणात झोपले असता. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे राहते घरी रात्रीचे वेळी येवुन पहिल्या खोलीतील कपाटातील ड्राव्हर मधील एका बँगमध्ये ठेवुन असलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी असे जु.की. 33,400/रू.चोरून नेला. पोलीस स्टेषन हिंगणघाट ठाणेदार श्री. अनिल राउत सा. यांचे मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण पोलीसी तंत्राचा वापर करून अज्ञात चोरटयाचा शोध घेतला आणि गुन्हयात आरोपी नामे यश विठ्ठल ठाकरे वय 21 वर्श रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यास ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी कडुन चोरीस केलेले 1) विवो कंपनीचा मोबाईल की. 4000/रू. 2) नगदी 2000/रू. व आरोपीने घटनेवेळी  वापरलेला जुना वापरता संमसंग कपंनीचा मोबाईल की. 3000/रू. 3)  अष्टकोनी पिवळया धातुजी 15 मनी वजन 0.990 मी.ली.ग्रॅम की. 11,137/रू. 4) एक लाखी डोळ(मनी) व त्याचा निघालेला पत्रा पिवळया धातुचा वनज 0.150 मीली ग्रॅम की. 1678/रू. 5) पांढ-या धातुचे दोन जोडवे वजन 6. 250 मीली ग्रॅम की.1250/रू.  जु.की. 23,065/रू. जप्त केला. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक सा. श्री. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सा. श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सा. श्री. सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनामध्ये पो.स्टे. हिंगणघाट येथील ठाणेदार श्री. अनिल राउत याचे आदेशाने व प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. नरेंद्र डहाके, पो.हवा. प्रविण बोधाने, पो.हवा.विकास अवचट, पो.ना. नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सुर्यवंशी पो.शि. आकाश कांबळे, पो.शि. सागर काळे  तसेच सायबर सेल, वर्धा यांनी केली  पुढील तपास सुरू आहे.
Previous Post Next Post