फैजपूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी; 28 हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

फैजपूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी; 28 हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

फैजपुर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी 


जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस स्टेशनने नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी हरवलेले एकूण 28 मोबाईल फोन शोधून काढत ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
Dy S.P. अनिल बडगुजर सहा.पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पथकाने विशेष मोहिम राबवली. हरवलेल्या मोबाईलचा CEIR पोर्टलच्या माध्यमातून मागोवा घेत, वेगवेगळ्या भागांतून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर आवश्यक पडताळणी करून ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत फैजपूर पोलिसांचे आभार मानले. या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, भविष्यातही अशा प्रकारे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फैजपूर पोलीस स्टेशनच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमास फैजपूर उपविभागाचे डीवायएसपी श्री अनिल बडगुजर पोस्टे प्रभारी अधिकारी मैनुद्दीन सय्यद, ज्यांनी या प्रकरणात  पोलीस कॉन्स्टेबल सागर सोनवणे,पो.कॉ. यांनी विशेष कामगिरी केली
Previous Post Next Post