*श्री. सप्तश्रृंगी ज्वेलर्स सराफा जबरी चोरी आरोपीस '७२ तासात' स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांचे कडून अटक, आरोपीच्या शोधार्थ अकोला पोलीसांनी चेक केले ५८० ठिकाणांचे सिसीटीव्ही फुटेज गुन्हयात वापरलेली पिस्टल सह २५,५८, २००/- रूपयाचा मुददेमाल जप्त आरोपीस दिनांक १६.०५.२०२६ पावेतो सहा दिवसांचा पी. सी.आर*
अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान
अकोला:दिनांक ०७.०५.२०२६ रोजी फिर्यादी जितेंद्र भास्करराव विसपुते वय ५४ वर्ष व्यवसाय सराफा श्री सप्तश्रृंगी अंलकार केंद्र जात सोनार रा युसुफ अली खदान महादेव मंदीरासमोर अकोला जि अकोला यांनी पोलिस स्टेशन खदान येथे रिपोर्ट दिला की, दि ०७/०५/२०२६ रोजी अंदाजे १२/४५ ते ०१/०० वाजताचे दरम्यान दुकानामध्ये हजर असतांना अचानक एक अज्ञात इसमाने फिर्यादीचे दुकानामध्ये प्रवेश करून पिस्टलचा धाक दाखवुन सोने व चांदीचे दागिने तसेच रोख ७५,०००/- रूपये असा एकुण ६९,९०,०००/- रूपयाचा ऐवज जबरीने लुट्न नेले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक १०३४/२०२६ कलम ३०९ (१), (२), (३) भा. न्या. सं सह कलम ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाने गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.
> घडलेल्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला श्री. अर्चित चांडक यांनी गुन्हा उघडकीस आपुन गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल तसेच आरोपी याचा शोध घेउन तात्काळ अटक करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर विभागातील पोलीस स्टेशन येथील डी.बी.चे ०३ अधिकारी, ३० अमंलदार तसेच पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके स्थागुशा, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील ०४ अधिकारी २० अमंलदार असे एकुण ०७ अधिकारी व ५० अमंलदारांचे विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले.
> पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता तयार करण्यात आलेल्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गुन्हा उघडकीस आपुन गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल तसेच आरोपी याचा शोध घेउन तात्काळ अटक करणे कामी वेगवेगळे तपास कौशल्य वापरणे बाबत तसेच गुन्हयात मार्गदर्शन करणे कामी तपास पथकांच्या दोन वेळा बैठका घेतल्या.
> मा. पोलीस अधिक्षक, अकोला यांनी दिलेल्या आदेश व सुचनेप्रमाणे स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पथकांनी एकुप ३३० तसेच शहरातील डी. बी. पथकांनी २५० असे अकोला शहर व वेगवेगळ्या ठिकाणाचे एकुण ५८० ठिकाणांचे सिसीटीव्ही फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदारा व्दारे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
> स्थानीक गुन्हे शाखा येथील पथकांनी तांत्रीक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती घेवुन आरोपीच्या मागावर राहुन आरोपीच्या शोथ कामी अंदाजे ७०० कि. मी चा प्रवास केला. सदरील प्रवासा दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा येथील पथकास माहीती मिळाली की, सदर गुन्हा हा भुसावळ येथील राहणारा रोहनसिंग सतनामसिंग बावरा रा. जामनेर रोड, भिरूड हॉस्पीटलच्या मागे, भुसावळ जि. जळगाव याने केल्याचे निष्पन्न झाले.
> तांत्रीक विश्लेषणाव्दारे व गुप्त बातमीदार यांचे कडुन निष्पन्न करण्यात आलेला आरोपीचा शोध घेणे असल्याने स्थानीक गुन्हे शाखा येथील दोन पथक भुसावळ येथे रवाना झाले. सदर गुन्हयातील आरोपी हा भुसावळ येथील खडका रोड येथे येणार असल्याबाबत गुप्त बातमीदाराव्दारे खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने सापळा रचुन आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीस विचारपुस केली असता आरोपी हा प्रदान परिसरातील सरकारी गोडावुनचे बाजुला असलेल्या एका भाडयाचे खोलीत राहुन, चादर विक्रीच्या बहाण्याने घटनास्थळ परिसरची केली होती रेकी.
> सदर आरोपीने दिनांक ०७.०५.२०२६ रोजी १३.०० वा दरम्यान श्री सप्तश्रृंगी अंलकार केंद्र आदर्श कॉलनी येथे बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हयात चोरी केलेला मुददेमाल अंदाजे १६० ग्रम पिवळ्या थातूचे दागिने अंदाजे किंमत २४,००,०००/- रूपये सध्याचे बाजारभावा प्रमाणे तसेच अंदाजे ४४० ग्रॅम पांढ-या धातुचे दागिने अंदाजे किंमत १,२३,२००/- रूपये सध्याचे बाजारभावा प्रमाणे तसेच गुन्हयात वापरलेली विदेशी बनावटीचा देशी कटटा अंदाजे किंमत ३५,०००/- असा एकुण २५,५८, २००/- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन उर्वरित मुददेमाल पी.सी. आर दरम्यान जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे. सदरील आरोपीस आज रोजी विदयमान न्यायालापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक १६.०५.२०२६ पावेतो सहा दिवसांचा पी.सी.आर दिला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी सा, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सपोनि विजय जाधव, पोउपनि विष्णु बोडखे, पोउपनि माजीद पठाण, पोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, गोकुळ चव्हाण, राहुल गायकवाड, प्रशांत केदारे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, सतिष पवार, धिरज वानखडे, श्रीकांत पातोंड, स्वप्नील चौधरी, अन्सार अहेमद, उदय शुक्ला, अशोक सोनवणे, अमोल दिपके सायबर विभागाचे स्वप्नील दामोदर, राहुल सानप, अतुल अजने, आकाश पांडे व चालक ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे, रामकिसन डोईफोडे, देवानंद खरात, मनिष ठाकरे तसेच शहर विभागातील सर्व डी. बी. पथकांनी गुन्हा उघड करणेस प्रयत्न केले आहे.*पोलीस टाईम मीडीया साठी अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*

