*पूर्णेत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी*
*युवासेनिका मध्ये नवचैत्यन*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
———————————
शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते नियुक्त्या जाहीर
पूर्णा शहरातील शिवसेना कार्यालयात आज युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान शिवसैनिक व युवासैनिकांनी घोषणाबाजी करत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस पदावर ओमकार देसाई, उप तालुकाप्रमुख पदावर प्रविण डाखोरे, तालुका समन्वयक पदावर उत्तम डुबे, गौर सर्कल प्रमुख पदावर रुपेश कदम तसेच एरंडेश्वर सर्कल प्रमुख पदावर गजानन चापके यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख गंगाखेड विधानसभा गजानन सवराते, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटराव पौळ, युवासेना तालुका प्रमुख दीपक सूर्यवंशी, उप तालुकाप्रमुख रामजी भालेराव, नवनाथ पारवे, रवी गायकवाड, संतोष सूर्यवंशी, मनोज उबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पदाधिकाऱ्यांनी युवासेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गावागावांत युवकांना जोडण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सामाजिक उपक्रमांमध्ये युवासेना सक्रियपणे काम करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमामुळे शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण व नवचैत्यन निर्माण झाले होते.
***

