पाथरी नगर परिषदेच्या वतीने महिला बचत गटाना अकरा लक्ष रूपयाचा धनादेश नगराध्यक्ष असेफ खाॅन यांच्याहस्ते वाटप*

*पाथरी नगर परिषदेच्या वतीने महिला बचत गटाना अकरा लक्ष रूपयाचा धनादेश नगराध्यक्ष असेफ खाॅन यांच्या हस्ते वाटप*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक ( अनिल चव्हाण )
———————————
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणी असेफ खाॅन यांनी निवडणूकीत महिलांना दिलेला शब्द पूर्ण केला.
प्रभाग 11 मधील बचत गटांना कर्ज वाटप
आज दिनांक 18 मे रोजी  पाथरी नगर परिषद पाथरी येथे प्रभाग क्रमांक अकरा (11 ) मधील तीन  महिला बचत गटांना तब्बल अकरा( 11 ) लक्ष रुपयाचे कर्ज  पाथरी नगर परिषदे पाथरीच्या शिफारशी नुसार बँके मार्फत देण्यात आले.
पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकी मध्ये जो महिला बचत गटांना शब्द दिला तो शब्द पाथरीचे कर्तव्यदक्ष विकास पूरूष नगराध्यक्ष असेफ खान यांनी पूर्ण केला.
ते म्हणतात ना ।। बोले तेसा चाले त्याची वंदावे पाहुले ।। असेच कार्य आज पाथरी नगर पालिकाचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी करून दाखवले आहे.
यावेळी पाथरी शहराचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी या प्रसंगी बोलतांना 
प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी लाडक्या बहिणीसाठी प्रभाग मधील नागरी सोई सुविधासाठी कुठली ही निधी कमी पडू देणार नाही  प्रभाग अकरा (11 ) पाथरी शहरातील सर्वात सुंदर प्रभाग असेल असा शब्द दिला.
प्रभाग क्रमांक अकरा (11) मधील महिला बचत गटांना पाथरी नगर परिषद सभागृह येथे ( चेक ) धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्रभाग अकरा ( 11 ) मधील सन्माननिय नगर सेवक आ. अमोलजी भालेपाटील,सन्माननिय नगर सेवक गोविंदरावजी हारकळ , सन्माननिय नगर सेवक अनिलराव ढवळे,  पाथरी नगर परिषदेचे कर्मचारी कच्छवे मॅडम, प्रधान सर, खाडे मॅडम, चिंचाने मॅडम व महिला बचत गटांचा महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या



****
Previous Post Next Post