*मानवत शहरात पेट्रोलचा तूटवड्यामुळे पंपवर शुकशूकाट*
———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण*
| मानवत शहरात पेट्रोलचा तूटवडा झाल्याने शहरातील पेट्रोल पंपावर शुकशुकाट
सविस्तर वृत्त असे की,
इराण अमेरीका युध्दामुळे आखातीदेशातील परिस्थिती लक्षात घेता केंद्राला कच्चा इंधनाचा पूरवठा होणे कम प्राप्त झाल्याने जिल्हासह तालूक्यातील इंधनावर याचा परिनाम झाला असून सरकार प्रयत्नशील असून ही सामान्य जनतेला पेट्रोल, झीजल, व गॅस मूबलक प्रमाणात मिळत नसल्याने व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तर अनेक वाहने रस्त्यावर उभी असल्याने अर्थव्यवस्थेला खीळ लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
आज शहरातील एका पेट्रोल पंपावर तूटवडा निर्माण झाल्यामुळे शुकशूकाट पाहावयास मिळाला याचा परिणाम तालूक्यातील सामान्य नागरिकावर पहावयास मिळाला आहे.
शहरातील गॅस नंतर पेट्रोल डीझल ची परिस्थिती अशीच राहिली तर आज २५ % वाहने रस्त्यावरून कमी झाली तर चार दिवसात ५०% वाहने थप्पीला लागतील अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहे.
***

