जागतिक डेंग्यू दिन हिंगणघाट शहरात साजरा व प्रभात फेरी काढण्यात आली...

जागतिक डेंग्यू दिन हिंगणघाट शहरात साजरा व प्रभात फेरी काढण्यात आली...

विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा 

        दिनांक 16/05/2026 ला जागतिक डेंग्यू दिवस जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,
 वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  डॉ. आशिष लांडे, 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तसेच  प्रभात फेरी काढण्यात आली.
    प्रभात फेरी फेरीच्या उद्घाटनासाठी माननीय नगराध्यक्षा डॉ. नयनाताई तुळसकर नगरपरिषद हिंगणघाट, आरोग्य सभापती श्री. संजय भाऊ माडे, पाणीपुरवठा सभापती श्रीमती.आखाडे, डॉ. आशिष लांडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, श्री. विशाल ब्राह्मणकर, साथरोग अधिकारी नगरपरिषद हिंगणघाट,  तालुका पर्यवेक्षक पुनम भुसारी , तालुका समूह  संघटक श्रीमती. पद्मा खरसान, इतर मान्यवर उपस्थित होते.
    प्रभात फेरीसाठी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थी, हिंगणघाट शहरातील आशाताई, अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.
प्रभात फेरीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
प्रभात फेरी हिंगणघाट शहरात फिरवून जनजागृती करण्यात आली समारोप उपजिल्हा रुग्णालयातील आवारात करण्यात आला.
  माननीय नगराध्यक्षा तुळसकर मॅडम यांनी हिंगणघाट शहरातील जनतेने डें‌ग्यु बाबत जागृत  राहावे  व डेंग्यु आजार  होणार नाही याची काळजी घ्यावी  असे आवाहन केले.
श्री उमेश मेश्राम  आरोग्य निरीक्षक यांनी डेंग्यू आजाराच्या दिन का साजरा करण्यात येतो याबाबत माहिती देऊन प्रस्ताविक केले. पुनम भुसारी तालुका पर्यवेक्षक यांनी डेंगू आजाराबाबत व हिवताप आजाराबाबत माहिती दिली. श्री अजय लिडबे समुपदेशक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन अवैद्यकीय सहाय्यक प्रशांत जंगठे यांनी केले, 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी ,  श्री .आखाडे, श्री. चव्हाणश्री. असलम फारुकी, श्री .डाखराम मेश्राम, श्री.राम मेश्राम, श्री. अमोल कुंभरे, शुभम गावंडे, सुभाष वाडगे, रोशन सावळीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व नगरपरिषद हिंगणघाट येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .
Previous Post Next Post