किशनदादा गायकवाड यांना दैनिक लोकनेता च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
*उमरी :* मौजे कुदळा ता. उमरी येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते समाजभूषण किशन दादा सटवाजी गायकवाड यांनी दैनिक लोकनेताचे उमरी ता. प्रतिनिधी झाल्यानंतर अल्पावधीतच निर्भिड पणे अन्याय, अत्याचारा विरोधात लेखन करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक लोकनेताने किशन दादा सटवाजी गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकनेताच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त परळी वैजनाथ येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमात दैनिक लोकनेताच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दि १० में २०२६ रोजी हाॅटेल भागवत पॅलेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी वैजनाथ जि. बीड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ), ज्ञानेश्वर मुंढे ( मुख्य संपादक दैनिक लोकनेता बीड), सौ. मेघना झुझम (अभिनेत्री - सावित्रीबाई फुले एकपात्री नाट्यप्रयोग फेम पुणे), डॉ. मयंक गांधी (संस्थापक GVT), रावसाहेब घुगे (संस्थापक
k बाप आयटी कंपनी) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते इतर व्यक्ती बरोबर समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
किशनदादा गायकवाड यांना लहानपणा पासूनच अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचारा विरोधात लढण्याचा छंद आहे. त्यांच्या पुढे कितीही अपयश आले तरी तो माघार घेत नाहीत.
सध्याच्या भ्रष्टाचारी काळात शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी, अन्याय ग्रस्त दलितांना व पिडीत महिला पुरूषांना न्याय मिळत नाही. काही पत्रकार बांधव चिरीमिरी मिळत नाही म्हणून सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी यांच्या विरोधात लेखणी उचलत नाहीत. किशनदादा गायकवाड यांना याची चिड येत होती. काही पत्रकार बांधवांना बातमी दिली तर लाचार पत्रकार बंधु जाहिराती मिळत नाहीत म्हणून अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करीत नव्हते. म्हणून किशनदादा गायकवाड यांनी स्वतः २०२४ साली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी नाशिक येथे पत्रकारीतेचा कोर्स पूर्ण करून पत्रकार पदवी प्राप्त करून दैनिक लोकनेताचे उमरी तालुका प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले आहे. कशाचीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या डोळ्यासमोर जी सत्य घटना घडली आहे. मग तो कोणीही असो, त्यांच्या विरोधात लेखणीद्वारे आवाज उठवुन पिडित लोकांना न्याय मिळवून दिला आहे. पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात बातम्या प्रसिध्द करून, निराधार, घरकुल योजनेचे लाभधारक, व शेतकरी यांना न्याय मिळवून दिला आहे. यांच्या धाडसी कार्याची दखल घेऊन दैनिक लोकनेता ने गायकवाड यांना दि १० मे २०२६ रोजी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या बाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, निर्भिड पत्रकार, समाजभूषण किशनदादा गायकवाड यांचे *लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार, सौ. पुनमताई राजेश पवार, मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी, व्हिपीके उद्योग समूह उमरी* भाजपा उमरी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सावंत, डॉ विक्रम देशमुख, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, नगरसेविका सायली कुलकर्णी, गंगाधर पाटील पुयड, अविनाश पाटील कदम, बापूसाहेब पाटील कौडगावकर व नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळी, व पत्रकार बांधवांनी पत्रकार किशनदादा गायकवाड कुदळेकर यांचे अभिनंदन केले असून पुढील भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत.

