विद्यार्थ्यांना वही पेन देऊन बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील, हिप्पारगा थंडी येथे.भीम सूर्याचा प्रकाश आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुका सदस्य पत्रकार मारोती एडकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयात विद्यार्थ्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरा विषयी माहिती देऊन वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते चेअरमन अहमद साहब, वंचित बहुजन आघाडीचे शाखा उपाध्यक्ष मोहम्मद बिल्लोना, वंचित बहुजन आघाडीचे शाखा सचिव बालाजी एडकेवार, पत्रकार राजेश अमेटवार, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, साहेबराव एडकेवार, शिवाजी एडकेवार, अनिल एडकेवार, ईश्वर एडकेवार, सुनील अंजनीकर, संजय भालेराव, संतोष अंजनीकर,अजय एडकेवार,व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका सदस्य मारोती एडकेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, यांनी वंचित घटकातील लोकांना सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्नशील कार्य करत असून,भारतात व महाराष्ट्रात,कुठेही एससी, एसटी, ओबीसी,अल्पसंख्याक, भटके विमुक्त, महिला व सामान्य नागरिक, लोकावरती अन्याय, झाल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरून रस्त्यावर सुद्धा उतरवून,सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम या करत आहेत,याबद्दल विद्यार्थ्यांना बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबां विषयी मार्गदर्शन केले. डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालय हिप्पारगा थडी येथे विद्यार्थ्यांना वही पेन फळ देऊन, वाढदिवस आदरणीय बाळासाहेब यांचा मोठ्या उत्साहात,साजरा करण्यात आला.

