*
११ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया पूढे *"स्वाभिमानी,,* करणार अध्यादेशाची होळी
——————————
स्वाभिमानी करणार नवीन शक्तिपीठ अध्यादेशाची होळी
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
दिनांक 5 मे 2026 रोजी राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाचा नवीन अध्यादेश काढून हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाची, मातीतल्या नात्याची आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याची होळी आहे.
या अन्यायकारक अध्यादेशाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने
“अध्यादेश होळी आंदोलन”
करण्यात येणार आहे.
तमाम शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन…
आज जर आपण शांत बसलो, तर उद्या आपल्या शेतावर बुलडोझर चालतील.
आपली जमीन, आपला हक्क आणि आपल्या लेकरांचे भविष्य वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, युवकांनी, माताभगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.
“शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे कोणतीही सत्ता मोठी नाही!”
दिनांक : 11 मे 2026
वेळ : ठीक सकाळी 11 वाजता
ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय समोर
***

