*आठवडी बाजारातील दोन दूकानांना आग ; नपाच्या अग्निशमन दलाच्या सर्तकतेमुळे आग आटोक्यात.*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
——————————
मानवत शहरातील मेन रोड वरील आठवडी बाजारातील दूकान लाईन मधिल बासेदभाई यांची मोबाईल शाॅप व पाशाभाई यांचे हाॅटेल या दोन दूकांनांना सकाळी ७/३० ते ८/०० च्या दरम्यान अचानक आग लागली याच लाईन मध्ये ७० ते ८० छोटे मोठे व्यावसायीकांचे दूकाने आहेत.
आग लागल्याची खबर मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळताच तात्काळ घटना स्थळावर हजर होऊन आग आटोक्यात आणली या वेळी
अग्निशामन अधिकारी मुंजाभाऊ गवारे वाहन चालक सय्यद कलीम फायरमन , राम दहे , मुकेश कुमावत , संदीप जाधव ,व आगीची माहिती देणारी न प कर्मचारी सागर गाडे , प्रसाद नेवरेकर यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेतल्यामुळे आग आटोक्यात आली.
त्यामुळे या लाईन वरील शेकडो छोटी दूकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मानवत नगर परिषदेच्या अग्निशमन दळ घटनास्थळावर तात्काळ पोहचल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला असल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे.
**

