सेवानिवृत्त जवान अशोक झिलपे यांचा देवळीत भव्य सन्मान; देशसेवेचा संदेश तरुणांना प्रेरणादायी....** ३८ वर्षांच्या सेवेनंतर गावात पुनरागमन; “देशसेवा हीच सर्वोच्च सेवा” – अशोक झिलपे

*सेवानिवृत्त जवान अशोक झिलपे यांचा देवळीत भव्य सन्मान; देशसेवेचा संदेश तरुणांना प्रेरणादायी....*

* ३८ वर्षांच्या सेवेनंतर गावात पुनरागमन; “देशसेवा हीच सर्वोच्च सेवा” – अशोक झिलपे

देवळी  वर्धा तालुका  प्रतिनिधी:-
(रविंद्र पारीसे)

             देवळी येथील सुपुत्र व सेवानिवृत्त जवान अशोक शंकर झिलपे यांचे गावात आगमन होताच नागरिकांनी उत्साहात व अभिमानाने स्वागत केले. त्यांच्या पत्नी जयश्री, मुलगा हर्षल, मुलगी प्रगती व झिलपे परिवार सह समजातील नागरिक उपस्थिती होती. तसेच शंकर झिलपे यांच्या जन्मदिन ९० वा साजरा करण्यात आला. तब्बल ३८ वर्षे देशसेवा बजावून गावात परतलेल्या या जवानाच्या सन्मानार्थ मित्रपरिवार व झिलपे कुटुंबीयांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
          मिरवणुकीची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच शहीद अशोक गेडाम यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर डीजेच्या तालावर, देशभक्तीपर घोषणांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात गावातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक चौकात नागरिकांनी थांबून जवानाचे जंगी स्वागत केले.
           या सोहळ्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. युवकांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दणाणून सोडले, तर महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्मान सोहळा अधिक भव्य केला.
         या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस, देवळी नगराध्यक्ष किरण ठाकरे, माजी नगराध्यक्षा शोभा तडस, सुरेश वैघ, नरेंद्र मदनकर, नगरसेवक रविंद्र कारोटकर, संजय झिलपे, छाया झिलपे, माजी नगरसेविका सुनिता बकाने, राजू झिलपे, अनुसया बजाईत, चंद्रकांत मेहेर, प्रवीण पेठे, विजय झिलपे, सुरेश उगेमुगे, भारत कुकडे, सीआरपीएफचे माजी सैनिक आनंद वानखेडे, हिरवारे, चद्रकांत मेहरे,रुपेश नेरकर, पत्रकार रविंद्र पारीसे, गणेश शेंडे, शहीद अशोक गेडाम यांच्या पत्नी जया गेडाम, बजरंग दल पदाधिकारी, व्यापारी संघटना तसेच सीआरपीएफ महिला मंडळ व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.
         यावेळी उपस्थित मान्यवरांनी जवानाचा सत्कार करून त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

*बॉक्स*
👉 माजी खा. रामदास तडस म्हणाले :
अशोक झिलपे यांच्यासारखे जवान देशाचे खरे अभिमान आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य काळ देशसेवेसाठी अर्पण केला आहे. अशा जवानांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी असून, त्यांच्या कार्यातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी. “देशसेवा ही सर्वोच्च सेवा” हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
👉नगराध्यक्ष किरण ठाकरे म्हणाले :
देवळीसारख्या छोट्या शहरातील सुपुत्राने ३८ वर्षे देशसेवा करून गावाचे नाव उज्ज्वल केले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा व्यक्तींमुळे समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ होते. नगरपरिषद व नागरिकांच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम करत भविष्यातही अशा सन्मान सोहळ्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
👉 सेवानिवृत्त जवान अशोक झिलपे म्हणाले :
माझ्यावर गावकऱ्यांनी केलेला हा सन्मान मी आयुष्यभर विसरणार नाही. देशसेवा करताना अनेक आव्हाने आली, परंतु मातृभूमीची सेवा करण्याचा अभिमान नेहमीच प्रेरणा देत राहिला. देशासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येक तरुणाच्या मनात असली पाहिजे. सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी पुढे येणे हीच खरी देशभक्ती आहे. शिस्त, समर्पण आणि देशप्रेम या मूल्यांमुळेच आपण एक सक्षम राष्ट्र घडवू शकतो. “आज मला मिळालेला सन्मान हा फक्त माझा नसून, देशासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा आहे.”
Previous Post Next Post