*शांताबाई नखाते विद्यालयाचे घवघवीय यश
प्रतिनिधी / अनिल चव्हाण
——————————
दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी /मार्च- 2026 मध्ये शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
विद्यालयाचा एकुण निकाल . 92.57%
पाथरी (प्रतिनिधी)
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित,शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालय पाथरी ता. पाथरी दहावी बोर्ड परीक्षा मध्ये याही वर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे .महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा च्या वतीने फेब्रुवारी /मार्च 2026 मध्ये दहावी बोर्ड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते प्रस्तुत विद्यालयातील 202 विद्यार्थी या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते यापैकी 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल . 92.57% लागला आहे विद्यालयातून
सर्वप्रथम- कु.गीतांजली दशरथ बुलंगे -96.40%,.सर्व द्वितीय-कु.श्रद्धा दादासाहेब पाते 96%
सर्व तृतीय-चि. गौरव सुखदेव यादव 94.60%
यांनी क्रमांक पटकावला आहे. 66 विद्यार्थी विशेष प्राविण्या सह तर 48 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये व 51 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिलभाऊ नखाते सचिव ,सौ.भावनाताई अनिलराव नखाते, संचालक तथा चेअरमन वाल्मिकी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाथरी आदित्य नखाते, संचालक तथा जि.प. सदस्य- अजिंक्य नखाते, गटशिक्षणाधिकारी राठोड एम.बी.
प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, रमेश सरोदे ,मुख्याध्यापक- एन. ई. यादव, के.एन.डहाळे, प्राचार्य आर व्ही.कांबळे यांच्यासह प्राध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
***

