पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील अप क्रमांक 715/2026 कलम 8(क),21(ब),21(क),29 एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चे तपासा दरम्यान पीसीआर मधील आरोपी यष सचिन श्रावणे वय 21 वर्श रा हिंगणघाट याचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेले एमडी अंमली पदार्थ हा दिनांक 05/05/2026 रोजी बुटटीबोरी येथील बिश्णोई नावाचे इसमाकडुन विकत आणल्याचे सांगितले
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
दिनांक 07/05/2026 नमुद इसमाचे राहते घराचा षोध घेवुन त्याचे घरी गेलो असता 1) कैलास बिराराम बिश्णोई वय 28 वर्श रा. करना,ता.सिंदरी जिल्हा बालोत्रा.राज्य राजस्थान ह.मु.बुटटीबोरी जि.नागपुर व 2) सुमादेवी ओमप्रकाष बिश्णोई वय 30 वर्श रा.राजीव नगर,तह.सान्सोंर,जिला जालोर राज्य राजस्थान ह.मु. रवी चौधरी यांचे घरी किरायाने रा.बुटटीबोरी जि.नागपुर घरी हजर मिळुन आले. पीसीआर मधील आरोपी यश श्रावने याने ओळखुन कैलास बिराराम बिश्णोई जवळुनच एमडी अंमली पदार्थ विकत घेतल्याचे सांगितल्याने नमुद इसमाचे राहते घराची दोन पंचासमक्ष एनडीपीएस कायदया अन्वये घरझडती घेतली असता घरझडतीमधे मॅफेड्रान अंमली पदार्थ पावडर ज्याचे निव्वळ वजन 265.8 ग्रॅम (3,500 रू प्रती ग्रँम) किं. 9 लाख 30 हजार 300 रूपये चा माल एका प्लॉस्टीक पन्नीमध्ये मिळुन आल्याने घझडती जप्ती पंचनामा प्रमाने जप्त केले.ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. श्री. सुशीलकुमार नायक सा. व मा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी कार्यवाही केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पो.नि अनिल राऊत पो.स्टे हिंगणघाट करीत आहे.

