*अकोला एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; जबरी चोरीचा आरोपी २ तासांत जेरबंद*
अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान
अकोला:येवता टी-पॉईंट परिसरात चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. आरोपीकडून लुटलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली २.२० लाखांची दुचाकी, असा एकूण २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नेमकी घटना काय?मूळचे बिहारचे रहिवासी असलेले फिर्यादी विक्रमकुमार सुरेश दुबे (३१) हे ८ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास येवता टी-पॉईंट येथे उभे होते. यावेळी काळ्या रंगाच्या 'टीव्हीएस अपाची' मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी मुलाने त्यांना लेबन कंपनीकडे सोडतो असे सांगून गाडीवर बसवले. काही अंतरावर गेल्यावर आरोपीने चाकूचा धाक दाखवून दुबे यांचा १३ हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि आपल्या साथीदारासह पसार झाला.पोलिसांनी कसा लावला छडा?घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्र फिरवले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपी मंगेश उत्तमराव वावगे (वय २१, रा. कैलास नगर, कुंभारी) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून १३ हजारांचा मोबाईल, ५०० रुपयांचा चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.यांनी केली कारवाई:ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बि. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक इशानी आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. विजय अंभोरे आणि पो.कॉ. भूषण सोळंके यांनी केली. पुढील तपास विजय अंभोरे करत आहेत. *अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*

