पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही विद्यालयांचे दैदिप्यमान यश; गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव

पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही विद्यालयांचे दैदिप्यमान यश; गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव


मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक { अनिल चव्हाण }
———————————
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, मानवत संचलित तिन्ही विद्यालयांनी आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशोगाथेचा सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. विजयकुमारजी कत्रुवार हे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री. बालकिशनजी चांडक, संस्थेचे सहसचिव मा.श्री. विजयकुमारजी दलाल, पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अनुक्रमे संचालक मा. श्री. दिलीपरावजी हिबारे, मा. श्री. संजयकुमारजी लड्डा, मा. श्री. अजिंक्यजी नखाते तसेच,एस.आर.के. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नागनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यालयांचा निकाल व गुणवंत विद्यार्थी:
१) सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालय, मानवत (निकाल १००%):
या विद्यालयाने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रविष्ट २९ पैकी २९ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष प्राविन्याने  उत्तीर्ण विद्यार्थी -18
प्रथम श्रेणीत - 04
द्वितीय श्रेणीत  - 06
पास श्रेणी - 01

  गुणानुक्रमे  : 
प्रथम: जानकी निलेशकुमारजी लड्डा (९९.२०%)
द्वितीय: प्रथमेश माणिकराव भालसत्रे (९३.००%)
तृतीय: धनश्री भगवानराव होगे (९२.८०%)

२) कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवनांद्रा 
(निकाल ९१.५६%):
ग्रामीण भागातील या विद्यालयातील ३१५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
परीक्षेसाठी नोंदवलेले परीक्षार्थी :-348
परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी :-344

 विशेष प्राविण्याने उत्तीर्ण श्रेणीमध्ये  :-91
प्रथम श्रेणी मध्ये पास: 89
द्वितीय श्रेणी मध्ये पास 93
पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण :-42
एकूण उत्तीर्ण परीक्षार्थी संख्या :- 315

प्रथम (विभागून): 
कु. अक्षरा संतोष कुसळे (९६.४०%) व 
चि. स्वराज रतन थोरे (९६.४०%)
द्वितीय: 
कु. दिव्या रमेशराव गोडबोले (९५.२०%)
तृतीय (विभागून): 
कु. सिद्धी महादेव काळे (९३.६०%) 
व कु. श्रावणी गणेश शिंदे (९३.६०%)

३) श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालय, मानवत 
(निकाल ९४.८५%):

परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी - 272  
उत्तीर्ण विद्यार्थी -258   
विशेष प्राविण्य श्रेणीत-83  प्रथम श्रेणीत -86,
द्वितीय श्रेणीत -65 
 उत्तीर्ण श्रेणीत -24 

प्रथम (विभागून): 
गौरी गोविंद पौळ (९४.४०%) व
 चि. शुभम कैलास पूकाणे (९४.४०%)
द्वितीय (विभागून): 
चि. ओम दामोदर देंडगे (९३.२०%) व
 कु. शारदा शंकर वावरे (९३.२०%)
तृतीय: 
कु. सेजल राजू कच्छवे (९३.००%)

सत्कार सोहळा व उपस्थितांचे मनोगत
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना  पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब होगे, श्री. पुंडलिक कजेवाड व श्री. विश्वभूषण इंगोले यांनी आपल्या विद्यालयाच्या  निकालाचा आढावा मान्यवरासमोर सादर केला. यावेळी मनोगतात मा.श्री संजयकुमारजी लड्डा,मा.श्री बालकिशनजी चांडक , विजयकुमारजी दलाल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मा.विजयकुमारजी कत्रुवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री.रामेश्वर वाघमारे यांनी केले,तर सत्कारार्थींच्या नावांचे वाचन श्री.ज्ञानेश्वर पांचाळ व श्री.रामेश्वर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले यांनी केले.या सोहळ्यासाठी पर्यवेक्षक एम.डी केकान,तिन्ही विद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मानवत व पाथरी तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

.
Previous Post Next Post